‘एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, धायरी’ येथे वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या गेस्ट लेक्चर सीरिजची सुरवात ‘चर्चा केंद्रीय अर्थसंकल्पाची २०२६’ या विषयाने करण्यात आली. या विषयावर मार्गदर्शन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहा. प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका, प्रा. डॉ.रिता मदनलाल शेटीया यांनी केले. एकूण पाच दिवस हि गेस्ट लेक्चर सिरीज चालणार असून वेगवेगळे विषय यात घेतले आहेत. असे महाविद्यालयाच्या अध्यक्ष डॉ. अनिता सापटे, उपाध्यक्ष आनंद सापटे आणि सचिव अनिल सापटे यांनी हि माहिती दिली. गेस्ट लेक्चर सीरिजचे उद्धघाटन आबेदा इनामदार महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. मुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश धारणे आणि उपप्राचार्य अंकुश जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या एच. सी. सविता शेटीया उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.डॉ. मुल्ला यांनी शिक्षणाचे महत्व पटवून सांगताना नवीन शेक्षणिक धोरणानुसार असलेला अभ्यासक्रम तसेच कौशल्याधारित शिक्षण तुम्हाला भविष्यात उपयुक्त असे आहे. अश्या गेस्ट लेक्चर्स मधून तुम्हाला तज्ञ् व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या. डॉ. रिता यांनी अर्थसंकल्प सोप्या पद्धतीने आणि व्यावहारिक उदाहरणांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना समजून सांगितला. दैनंदिन व्यवहारात देखील व्यक्तिगत अर्थसंकल्प कसा महत्वाचा असतो याचे देखील महत्व सांगितले. अर्थसंकल्प यशस्वी होतो ते योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, निधीचा पारदर्शक वापर आणि विकासाचा लाभ समाजातील सर्व स्तरातील घटकांपर्यंत पोहचवणे. विकसित भारताचे स्वप्न साकारायचे असेल तर या तिन्ही घटकांवर लक्ष देणे महत्वाचे आहे. तरच सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट सध्या होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना शहाणे आणि योगिता राऊळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वर्ग श्रीमती श्रुती रेगे, वैशवी जेटके, श्री. शुभम कदम, पूर्णिमा तिडके आणि कमल जाधव आणि शिक्षकेत्तर वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
















