
बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व यांचा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे 57 वर्धापन दिनांक 24,25, 26 जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांच्या कलेचे योगदान लोककलेच्या लोककलेचा गौरव म्हणून लोककला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावर्षीचा 2025 चा लोककला गौरव पुरस्कार संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे चिरंजीव संजय महाडिक यांना हा पुरस्कार बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज भोसले, सचिव अनिल गुंजाळ, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.संजय महाडिक हे संगीतरत्न दत्ता महाडिक यांचे चिरंजीव आहेत. ज्यांनी तमाशा कला सातासमुद्र पार केली. असे तमाशा संगीताचे शिरोमणी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन झाल्यानंतर आज पर्यंत संजय महाडिक यांनी संगीतरत्न दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळाचा फड अतिशय कष्टाने सुरू ठेवला आहे. अगदी जबाबदारी चालवून लोककला जतन ठेवण्याचे काम केले आहे. वडील कै. संगीतरत्न दत्तामहाडिक यांची गाणी आणि त्यांच्या गाण्याची लकब आजही संजय महाडिक हे हुबेहुब गाणी सादर करून रसिकांची मने खेचतात. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन बालगंधर्व परिवार ट्रस्टने त्यांना सन 2024-2025 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याबद्दल ग्रामपंचायत मंगरूळ ता. जुन्नर जि. पुणे. यांस कडून त्यांना सन्माणीत करण्यात आले. त्या प्रसंगी मंगरूळ गावाच्या प्र. सरपंच सौं. मनीषाताई विवेक खिलारी तसेच ग्रा. प. सदस्य श्री.ज्ञानदेव खराडे ग्रा. प. सदस्य श्री.विनायक लामखडे ग्रा. प. सदस्य श्री.प्रशांत भोजने ग्रा. प. सदस्या सौं.सोनिया ताई कोरडे ग्रामपंचायत सदस्या सौं.सविताताई खराडे ग्रामपंचायत सदस्या सौं.सुनिता नवनाथ चिकणे , ग्रामपंचायत सदस्या सौं.सुनीता बाबाजी लामखडे या ही उपस्थित होत्या.सर्वांनीच संजय महाडिक यांचे कौतुक करत पुढील वाटचाललीस शुभेच्छा दिल्या.
