शासकीय अनुदानित वसतिगृह कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य या संघटनेची मीटिंग शुक्रवार दिनांक 25 /7 /2025 रोजी माजी सामाजिक न्याय मंत्री आणि शासकीय अनुदानित वसतीगृह कर्मचारी युनियन सन्माननीय अध्यक्ष ना. श्री. बबनराव घोलप साहेब यांचे उपस्थितीत युनियन पदाधिकारी निवड सभा बीड येथे पार पडली. या निवड सभेमध्ये श्री भागवत अशोक गोल्डे, आळंदी ता. राजगुरुनगर जि. पुणे यांची युनियनचे पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर बहुमताने निवड करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, वसतिगृह कर्मचारी यांनी भागवत गोल्डे त्यांना भावी वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या.
