जुन्नर: चिंचोली गावातील श्री समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्ट संचालित श्री समर्थ मधुकरराव विद्यालयामध्ये शनिवार दिनांक २८ जून रोजी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना विकास प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले, तसेच या विद्यालयातील शिक्षक श्री. विठ्ठल भोर सर ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या ६ विद्यार्थ्यांना कु. आयुष गणेश चव्हाण ८३.६०%, कु. जोया इम्रान चौगुले ८३.४०%, कु. स्वराली नवनाथ ताजणे ८३.२०%, कु. पार्थ भास्कर काशिद ८१.८०%, कु. ऐश्वर्य सावकार खिल्लारी ८१.४०%, कु. दीक्षा सुरेश डोळस ८१.४०% या सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी विकास प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक विकास डोळस, माजी पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, सिद्धेश महाराज वाबळे, सरपंच खंडू काशिद, उपसरपंच इम्रान चौगुले, नवनाथ काशिद, बबन काशिद, अरुण काशिद, नवनाथ ताजणे, सचिन खराडे, पांडुरंग काशिद, तुकाराम चव्हाण, संदीप खोंड, मुख्याध्यापिका सुरेखा कांबळे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
