शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी पुणे येथील एफिनिटी एक्स , दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे,उर्मी संस्था पुणे यांच्या सौजन्याने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील 2300 विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप करण्यात आला.आपल्या जिल्हा परिषद शाळा आळू शाळेतील 39 मुलांना सदर रेनकोट व खाऊ वाटप करण्यात आला.
आदिवासी, दुर्गम भागातील गरीब, गरजू, होतकरू मुलांच्या शिक्षण प्रवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी या सेवाभावी संस्था मदत करत असतात.त्याबद्दल या संस्थांचे ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
सदर वाटप कमी आदरणीय श्री. संतोष जाधव साहेब पुणे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सल्लागार श्री.संजय डुंबरे सर, सानेगुरुजी कथा माला अध्यक्ष श्री.बाळासाहेब कानडे सर, पतसंस्था जुन्नर सभापती श्री.संतोष पाडेकर सर, बाळासाहेब ठोंगिरे, समीर कुटे सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गुलाबराव सुपे, पोपट बोकड, विष्णू बाबा बोकड, सरपंच सौ.पारुबाई मुठे, शुभांगी पाडेकर मॅडम, सोनल हांडे मॅडम, सुमन सुपे, सुमन मुठे मॅडम, व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
