
जरांगे पाटलांच्या मुंबई तील उपोषणानंतर शासकीय जी आर नुसार आंबेगाव तालुका संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार नागटिळक साहेब यांना गावोगावी जनता दरबार घेऊन ग्राम प्रशासनाचे मदतीने गोरगरीब मराठा समाजाला कुणबी दाखले वितरीत करावे यासाठी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, मराठा महासंघ , संपूर्ण मराठा समाजाचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार साहेबांनी आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत दहा ते बारा हजार कुणबी दाखले वितरीत करण्यात आले असून आज आपण दिलेल्या निवेदनानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. सुरेखाताई निघोट, मराठा महासंघ जिल्हाप्रमुख अंकुश लांडे, स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट, लांडेवाडी च्या सरपंच संगिता शेवाळे, अवसरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य ऊर्मिला तांबेजिल्हा मार्गदर्शक नवनाथ गावडे, जिल्हा सरचिटणीस खंडु शेटे, तालुका संघटक विठ्ठल शेटे गरुडझेप प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश खानदेशे, एड.भानुदास काळे , सामाजिक कार्यकर्ते योगेश हुले, उपतालुकाप्रमुख अजित गुंजाळ समाजसेवक अशोक काळे, मा सरपंच दिलीप चासकर,बंटी मोरडे, कविता निघोट, मोहना निघोट व मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनोज दादा जरांगेंच्या मुंबईतील उपोषणास उपस्थित मराठा सेवक अजय मुळुक,आशिष घोलप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
